मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान
राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” या महत्वाकांक्षी अभियानाच्या अंमलबजावणीचा निर्णय घेतला आहे. यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींना त्यांच्या कामगिरीनुसार प्रोत्साहित करून त्यांची कार्यक्षमता वाढविणे, त्यांना स्पर्धात्मक वातावरणातून नवीन उर्जा देणे, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे, योजनांचा लाभ ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे व त्यातून ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचावणे या उद्देशाने ही योजना तयार करण्यात आली आहे. ग्रामपंचायतींमध्ये लोकसहभागाची चळवळ निर्माण करणे, ग्रामीण नागरिकांना सुलभ रीतीने सेवा देणे, आरोग्य, शिक्षण, उपजीविका, सामाजिक न्याय या क्षेत्रांमध्ये ग्रामपंचायतींचा सहभाग वाढविणे, यासाठी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षापासून “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” राबविण्यात येणार आहे.
- मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराजअभियानाचा हेतू -
• विकासाच्या योजनांची प्रभावी व जलदगतीने अंमलबजावणी
• योजनांचा लाभ गावातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविणे
• लोकांचे जीवनमान उंचावणे
• नागरीकांना सुलभ रीतीने सेवा पुरविणे
• आरोग्य, शिक्षण,उपजीविका, सामाजिक न्याय यामध्ये काम करणे
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत चुंबळी ग्रामपंचायतने केलेली कामे
🌧️ पाणीपुरवठा व जलसंधारण
गावातील पाणीपुरवठा सुधारणा, जलसंधारण आणि पाणी व्यवस्थापन
- 💧 घरोघरी पाण्याची पुरेशी व्यवस्था
- 🌧️ सर्व शासकीय इमारतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग
- 🚰 शेतकऱ्यांसाठी सौर पंपाचा वापर
- 🕳️ वैयक्तिक व सामूहिक शेततळे
- 🏞️ गावात जलसंधारणाची विविध कामे
- ⚙️ शाळेत टू-इन-वन वॉटर पंप
- 🚿 अंगणवाडी व शाळेत हँडवॉश स्टेशन
- 🛢️ सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प
🏫 शिक्षण व बालविकास
मुलांच्या भविष्यासाठी उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा आणि अंगणवाडी विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले.
- 🏫 जिल्हा परिषद शाळेचे बांधकाम व कंपाउंड
- 📚 डिजिटल शाळा, स्मार्ट क्लास व E-Learning
- 🧁 नवीन अंगणवाडी इमारती व सुविधा
- 🧼 हँडवॉश स्टेशन – शाळा व अंगणवाडी
- 🎨 बोलक्या भिंती / शैक्षणिक भित्तीचित्रे
- 🍽️ किचन शेड (मिड-डे मील)





































